मुंबई

मोकाट गुरांचा वाहतुकीला अडथळा

CD

मोकाट गुरांचा वाहतुकीला अडथळा
शहाजी राजे मार्गावर अपघाताची भीती; नागरिक त्रस्त
मालाड, ता. ६ (बातमीदार) : पूर्वेकडील शहाजी राजे मार्गावर मोकाट सोडण्यात आलेल्या गाय, म्हैस यांसह इतर गुरांमुळे पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर अचानक येणाऱ्या या जनावरांमुळे वाहनचालकांना अपघात होण्याची भीती असून, नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
शहाजी राजे मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर काही ठिकाणी गुरे रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्याच्या कडेला बसलेली दिसून येतात. अचानक एखादे जनावर रस्त्यावर धावून आल्यास दुचाकीस्वारांना वाहनाचा ताबा गमावण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात ही जनावरे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येत असल्याने धोका अधिक वाढतो.
दरम्यान, काही नागरिकांनी मोकाट गुरांमुळे केवळ वाहतुकीलाच अडथळा निर्माण होत नसून, पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे सांगितले. गाय किंवा म्हैस अचानक अंगावर धावून आल्यास नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना अशा परिस्थितीत अधिक काळजी घ्यावी लागत आहे.

तातडीने उपाययोजना करावी!
मोकाट गुरांच्या मालकांनी जनावरे रस्त्यावर सोडू नयेत तसेच संबंधित महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट गुरांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघात किंवा एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

SCROLL FOR NEXT