मुंबई

फ्रेंड सर्कलतर्फे डहाणू येथील ४३० आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

CD

४३० आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

पितृपक्षानिमित्त सामाजिक उपक्रम

कासा,ता.६ (बातमीदार): डहाणू तालुक्यातील रामपूर, वरठापाडा, व्याहळे व पशिरूपाडा परिसरातील आदिवासी कुटुंबांना मुंबई काळबादेवी येथील फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे पितृपक्षानिमित्त मदतीचा हात देण्यात आला. जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात ४३० आदिवासी महिलांना चादरी,मिठाई व नमकीनचे वाटप करण्यात आले.तसेच प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील ३३५ विद्यार्थ्यांना नवीन कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.फ्रेंड सर्कलचे लतेश गुप्ता, मिशरामुका, शारदा गुप्ता, बिनाती, मिनू जेरीवाल व गोयंकाजी यांच्या हस्ते वरठापाडा, रामपूर व व्याहळे येथील प्राथमिक शाळांमधील तसेच अंगणवाडीतील ३३५ विद्यार्थ्यांना नवीन कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिलांना मुलांचे शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक बांधीलकी या विषयांवर शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांनी मार्गदर्शन केले. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणाऱ्या फ्रेंड सर्कल ग्रुपचे त्यांनी आभार मानले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वरठा शाळेचे महाले , रामपूर वाघदडा, एन.चौधरी , ग्रामस्थ विनोद बेंदर, सुरेश कोकेरा, संजय वरठा, माहू वरठा, जानू मागी, सिताराम सावटा तसेच अंगणवाडी सेविकांनी विशेष सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

SCROLL FOR NEXT