मुंबई

उद्यापासून सकाळ करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा

CD

उद्यापासून सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा
मुंबईच्या विभागीय फेरीत सादर होणार आठ कलाकृतींचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यभरातील तरुण रंगकर्मींचे लक्ष लागलेल्या राज्यस्तरीय ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सलग दोन वर्षे महाकरंडक जिंकलेल्या मुंबई विभागीय फेरीचा पडदा गुरुवारी (ता. ८) उघडणार आहे. यात विविध महाविद्यालयांच्या एकूण आठ नाट्यकलाकृती सादर होणार असून, सकाळी ९ वाजतापासून माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ही स्पर्धा सुरू होईल.
राज्यभरात ३ ऑक्टोबरपासून या स्पर्धेची विभागीय फेरी सुरू झाली असून, दरवर्षी महाअंतिम फेरीत आपला खास ठसा उमटवणाऱ्या मुंबई विभागीय स्पर्धेवर यावर्षीही नाट्यरसिकांच्या नजरा खिळल्या आहेत. या स्पर्धेचे सहप्रायोजक रिलायन्स डिजिटल आहे. मुंबई विभागातून प्रथम येणारी एकांकिका १८ नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
महाविद्यालयीन रंगभूमीवरील नव्या पिढीची कल्पकता, अभिनय आणि दिग्दर्शनाला वाव देणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतून राज्यभरातील तरुण कलाकारांना आपली कलात्मक क्षमता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महाविद्यालयीन कलावंतांचा हा नाट्याविष्कार बघण्यासाठी रसिकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार असून, काही जागा मात्र राखीव ठेवण्यात येणार आहेत. स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता मुंबई विभागीय अंतिम फेरीचे बक्षीस वितरण होणार आहे. त्यासाठी नाट्य-सिने कलावंतांची खास उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.

मुंबईत सादर होणाऱ्या एकांकिका
गुरुवारी सकाळी ९ वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार असून, पहिले पुष्प सिडेनहॅम महाविद्यालय ‘यात्रा’ या एकांकिकेद्वारे गुंफणार आहे. त्यानंतर ठाण्याचे सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ‘खोटं बोल नाऱ्या’ ही कलाकृती सादर करेल. आर. ए. पोद्दार कॉलेज ‘मालिक’द्वारे स्पर्धेत तिसरी एकांकिका सादर करेल. डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय ‘जिलेबी’चा गोडवा सांगणार आहे. त्यानंतर चेतना कॉलेजची ‘मॅरेथॉन’ सादर होईल. विद्यालंकार कॉलेजची ‘शुभमंगल सावधान’ या कलाकृतीनंतर कीर्ती कॉलेजची ‘हर हर गंगे’ ही एकांकिका सादर होईल. स्पर्धेत शेवटचे पुष्प महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या ‘अर्जुनाचं झाड’ या एकांकिकेद्वारे गुंफले जाणार आहे.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT