मुंबई

एलिसा चाचण्या अत्यल्प

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : पावसाळ्यात डेंगी आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संशयित रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात रॅपिड चाचण्या होत असल्या, तरी आजाराची खात्री करण्यासाठी केल्या जाणाऱ्या एलिसा तपासण्यांची संख्या अत्यल्प असल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या ‘आरटीआय’मधून समोर आले आहे. २०२२ पासून ऑगस्ट २०२६ पर्यंत डेंगी आणि लेप्टोस्पायरोसिसच्या हजारो रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या अनेक वर्षांत शून्य किंवा अत्यल्प आहे.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागविलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये रुग्णालयात डेंगीच्या ११ हजार ६२८ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या, मात्र एलिसा तपासणीद्वारे एकाही रुग्णाच्या आजाराची खात्री झाल्याची नोंद नाही. २०२३ मध्ये १३ हजार ७२३ रॅपिड चाचण्यांपैकी केवळ १० रुग्णांच्या आजाराची एलिसाद्वारे खात्री झाली. २०२४ मध्ये १४ हजार २२७ रॅपिड चाचण्या झाल्या, तर केवळ एका रुग्णाची एलिसा तपासणीद्वारे खात्री झाली. २०२५ मध्ये डेंगीच्या १२ हजार ६८४ रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या पुन्हा शून्य आहे. २०२६ मध्ये ३१ ऑगस्टपर्यंत आठ हजार ८०९ रॅपिड चाचण्या झाल्या असून, एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झाल्याची नोंद नाही.

एलिसा म्हणजे एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट...ही शरीरातील द्रवपदार्थांमध्ये (विशेषतः रक्त) विशिष्ट प्रतिपिंडे, प्रतिजन, प्रथिने किंवा हार्मोन्स शोधणारी आणि मोजणारी एक महत्त्वाची वैद्यकीय चाचणी आहे. एचआयव्ही, लायम रोग, जिवाणू व विषाणूजन्य संसर्ग, तसेच थायरॉईड यांसारख्या विविध आजारांचे निदान करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे.

‘लेप्टो’च्या तपासण्यांमध्येही तफावत
लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीतही अशीच स्थिती दिसून येते. २०२२ मध्ये १० हजार ४८२ आणि २०२३ मध्ये १२ हजार ६४५ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी अनुक्रमे एकाही आणि दोन रुग्णांच्या आजाराची एलिसा तपासणीद्वारे खात्री झाली. २०२४ मध्ये १३ हजार ५९४ आणि २०२५ मध्ये पाच हजार ७०७ रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झाल्याची नोंद नाही. यंदा ऑगस्टपर्यंत सात हजार ३०५ लेप्टो रॅपिड चाचण्या झाल्या असून, एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झालेली नाही.

चिकुनगुनियाची तपासणीही थांबली
चिकुनगुनियाच्या तपासण्यांमध्येही घट झाली आहे. २०२४ मध्ये रुग्णालयात १८५ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या आणि त्यापैकी एका रुग्णाच्या आजाराची एलिसा तपासणीद्वारे खात्री झाली. २०२५ मध्ये १४३ रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीची नोंद नाही. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत रॅपिड तसेच एलिसा अशा दोन्ही तपासण्यांची नोंद शून्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT