मुंबई

आदिवासी विद्यार्थ्यांची अखेर घरवापसी

CD

आदिवासी विद्यार्थ्यांची अखेर घरवापसी
टिळक भवनातील आंदोलनाची सांगता; पोलिसांनी १० बसची केली व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला. या विद्यार्थ्यांची तब्बल दोन दिवसांनंतर नाशिकला रवानगी करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या धरपकडीनंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले होते. या विद्यार्थ्यांच्या रवानगीमुळे काँग्रेस नेते व पोलिस दोघांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
विविध मागण्यांसाठी गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आज (ता. ६) सांगता झाली. नाशिकहून हे विद्यार्थी राजभवनला धडक देण्यासाठी पायी मुंबईत दाखल झाले होते. या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची तात्पुरती मुक्कामाची सोय दादर येथील टिळक भवन आणि पालिकेपुढील काँग्रेस कार्यालयात केली होती. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यातून सोमवारी मध्यरात्री या दोन्ही कार्यालयांतून या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कृतीनंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले होते.
राज्यपालांना भेटू देण्याची त्यांची मागणी होती. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांना आम्ही धुळे, नाशिक, नंदुरबारपर्यंत सोडून देणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे आंदोलनाची परवानगी नाकारल्यामुळे हा प्रश्न सोडवणे गरजेचे होते. अनेक विद्यार्थ्यांची तब्येत बरोबर नव्हती. त्यामुळे या मुलांना त्यांच्या जिल्ह्यात सोडून देण्याची विनंती आम्ही पोलिसांकडे केली. आंदोलनाचा विषय महत्त्वाचा असला तरी शेवटी हे विद्यार्थी आपापल्या घरी जाणे महत्त्वाचे होते, असे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

तब्येत ढासळली
दुसऱ्या दिवशी सुटका झालेल्या दोनशे ते अडीचशे मुलांची व्यवस्था टिळक भवनच्या हॉलमध्ये करण्यात आली होती. मुंबईकडे पायी चालत आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तब्येत ढासळली होती. अनेक जण अशक्त झाले होते. यातील काही विद्यार्थ्यांना भोवळ आली, तर अनेकांना डॉक्टरांकडे न्यावे लागल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले. सर्वांसाठी नाश्ता व जेवणाची सोय काँग्रेसकडून करण्यात आली होती.

समन्वयाची भूमिका
दोन दिवस टिळक भवनला पोलिसांचा वेढा होता, असे चित्र होते. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या यापूर्वी मान्य केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. सकाळपासून पोलिस आणि विद्यार्थ्यांची बोलणी सुरू होती. काँग्रेस नेत्यांनी यामध्ये समन्वयाची भूमिका घेतली. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना मुंबईत कुठेही आंदोलन करण्यास परवानगी मिळणार नाही. टिळक भवनच्या बाहेर पडल्यावर आम्ही त्यांना अटक करू, अशी पोलिसांची भूमिका होती. शेवटी यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांनी घरी जाण्याची तयारी दाखवली. पोलिसांनी जवळपास १० ट्रॅव्हल बसची सोय केली होती. मुंबईबाहेर नव्हे, तर त्यांच्या शहरापर्यंत सोडून देण्याची तयारी मुंबई पोलिसांनी दाखवली. दुपारी हे सर्व विद्यार्थी या बसमधून रवाना झाले. या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही बसमध्ये केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT