मुंबई

‘हल्लेखोर नव्हे, कटामागील सूत्रधार शोधा - अंबादास दानवे

CD

हल्लेखोर नव्हे, कटामागील सूत्रधार शोधा - अंबादास दानवे
पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरही या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. ६) पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केवळ आरोपींच्या अटकेने तपास पूर्ण होत नाही; तर हत्येचा कट रचणाऱ्यांपर्यंत पोलिसांनी पोहोचले पाहिजे,’ अशी भूमिका मांडली.
मानपाडा येथे पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि घटनेपूर्वीच्या घडामोडींची माहिती दानवे यांनी घेतली. कुटुंबीयांनी सांगितलेल्या बाबी, हत्येची पार्श्वभूमी आणि आतापर्यंत झालेली पोलिसांची कारवाई याबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत दानवे यांनी तपासाच्या व्याप्तीवर प्रश्न उपस्थित केले. हल्ला करणारे कोण, एवढ्यापुरता तपास मर्यादित ठेवण्याऐवजी हत्येची सुपारी कोणी दिली, कटाची आखणी कुठे झाली, आरोपींना कोणाकडून मदत मिळाली आणि या गुन्ह्यामागे आर्थिक किंवा अन्य कारणे कोणती होती, याबाबतचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. ठाण्यातील राजकीय कार्यकर्त्याची हत्या होणे ही चिंतेची बाब असून, नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. तपासात कोणाचीही गय झाली तर हा मुद्दा सभागृहापासून रस्त्यापर्यंत लावून धरू, असा इशाराही दानवे यांनी दिला.
---------
कुटुंबीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविणार - कपिल पाटील
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर पूर्णेकर कुटुंबीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविणार असल्याची ग्वाही प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या प्रकरणात पोलिसांची कारवाई सुरू असून, फरार आरोपींसह सर्व आरोपींना पोलिस लवकरच अटक करतील. कोणताही आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT