मुंबई

‘कोपर्डी’ प्रकरणाचा निकाल राखीव

CD

कोपर्डी प्रकरणाचा निकाल राखीव
कोपर्डी गावाला भेट देऊन पाहणी; दोषींच्या अपिलावरही सुनावणी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा,

मुंबई, ता. ६ : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी (अहिल्यानगर) येथील १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ६) राखून ठेवला.

न्या. भारती डांगरे आणि न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर प्रकरणाची सोमवारी अंतिम सुनावणी सुरू केली होती. घटनाक्रमाबाबतच्या परस्परविरोधी दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी खंडपीठाने घटनास्थळाची रचना, दृश्यमानता आणि साक्षीदारांची त्या वेळची स्थिती यांची पाहणी केली होती. याप्रकरणी मंगळवारी सुनावणीवेळी अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याबाबतची याचिका आणि आरोपींचे शिक्षेविरोधातील अपिलावरील निकाल राखून ठेवला.  गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी पाहता त्यांना फाशीची शिक्षा देणेच योग्य ठरेल, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला. शिंदेने मृत मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिचा गळा आवळून हत्या केली असली, तरी भावल आणि भैलुमे यांचा गुन्ह्याचा कट रचण्यात आणि गुन्हा घडवून आणण्यात सक्रिय सहभाग होता, असेही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी करताना सरकारकडून सांगण्यात आले.

प्रकरण काय?
दहा वर्षांपूर्वी १३ जुलै २०१६ला १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. नोव्हेंबर २०१७ मध्ये अहमदनगर सत्र न्यायालयाने जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भावल आणि नितीन गोपीनाथ भैलुमे या तीन आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. प्रकरणातील मुख्य आरोपी शिंदे याने २०२३ मध्ये पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्यामुळे त्याच्याविरुद्धची फौजदारी कायदेशीर कार्यवाही संपुष्टात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT