मुंबई

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

CD

दुष्काळात शेतीला संजीवनी
प्रत्येक जिल्ह्याला नवीन एक हजार रोहित्र; राज्य शासनाचा निर्णय
मुंबई, ता. ६ : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वितरण रोहित्रे, ‘स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर’ (एसडीटी) आणि ‘कॅपॅसिटर बँक’ खरेदीसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.
या निधीतून आवश्यकतेनुसार प्रत्येक जिल्ह्यात नवीन एक हजार रोहित्रे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. अतिभारित किंवा नादुरुस्त रोहित्रे बदलल्याने सिंचनासाठी होणारा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. महावितरणकडून राज्यातील सुमारे ४७ लाख कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थितीत हा पुरवठा सुरळीत राहणे आवश्यक असल्याने वीज यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
कृषी वीजवाहिन्यांवरील घरगुती ग्राहक आणि शेतातील घरांना २४ तास सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यकतेनुसार सिंगल फेज व थ्री-फेज स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात येणार आहेत. तसेच लांब अंतराच्या वीजवाहिन्यांवर कमी दाबाची समस्या दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार कॅपॅसिटर बँक बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात योग्य दाबाने आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

SCROLL FOR NEXT