मुंबई

धारावीत पाणीबाणी; रहिवाशांचा मोर्चा

CD

धारावीत पाणीबाणी; रहिवाशांचा मोर्चा
कमी दाबाने पाणीपुरवठा; गढूळ पाण्यामुळे नागरिक त्रस्त
धारावी, ता. ७ (बातमीदार) : मुंबईत सुरू असलेल्या पाणीकपातीचा परिणाम धारावीतील पाणीपुरवठ्यावर जाणवू लागला आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असून, काही ठिकाणी पाणीपुरवठ्याची वेळही कमी करण्यात आल्याने रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. या समस्येविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. ६) पालिकेच्या दादर येथील जी-उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
धारावीतील विविध भागांत सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळा पाणी सोडले जाते, मात्र नळाला पाणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीची सुमारे १० मिनिटे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. त्यामुळे हे पाणी वापरणे शक्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजर्षी शाहूनगर, संत कक्कया मार्ग, ढोरवाडा, शास्त्रीनगर आणि काळा किल्ला परिसरात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे रहिवाशांनी सांगितले. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून कमी दाबाचा प्रश्न सोडवावा, जलवाहिन्यांची गळती दुरुस्त करावी आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चात आमदार महेश सावंत, नगरसेविका अर्चना शिंदे, नगरसेवक जोसेफ कोळी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे पदाधिकारी विठ्ठल पवार, महादेव शिंदे यांच्यासह धारावीतील नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम
धारावीतील लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याचे नियोजन झाले नसल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली असून, अनधिकृत नळजोडण्यांमुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच परिसरात वाढलेल्या इमारतींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वसामान्य रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शाहांशी भेट; दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT