मुंबई

पितृपक्षात फुलबाजार कोमेजला

CD

वज्रेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटल्याने वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी आणि अंबाडी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात चांगला दर मिळाल्यानंतर सध्या बाजारातील मंदीचा फटका बसत आहे. आता ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाकडून उत्पादकांना बाजारपेठेत पुन्हा तेजी येण्याची अपेक्षा आहे.
गणेशोत्सवात झेंडू, शेवंती, गुलछडी, लिली, तुळस आणि गुलाबासह विविध फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे उत्पादकांना समाधानकारक दर मिळाला. मात्र, गणेशोत्सव संपल्यानंतर फुलांची मागणी कमी झाली असून, दरही घसरले आहेत. पितृपक्षात धार्मिक कार्यक्रमांमध्ये फुलांचा वापर तुलनेने कमी होत असल्याने त्याचा थेट परिणाम विक्रीवर झाला आहे. वज्रेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या काळात देवीची पूजा, घटस्थापना, मंदिर व मंडपांची सजावट; तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी फुलांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. वज्रेश्वरी देवी मंदिर, अकलोली कुंड, गणेशपुरी येथील धार्मिक स्थळे आणि अंबाडी परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढणार असल्याने फुले, हार, वेण्या आणि पूजासाहित्याच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

नवरात्रात दरवाढीची अपेक्षा
नवरात्रोत्सवात झेंडू आणि शेवंतीसह विविध फुलांना मागणी वाढते. मात्र, यंदाचे दर उत्पादन, बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून राहणार आहेत. पितृपक्षातील मंदीनंतर नवरात्रोत्सवात फुलांना चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : औंधमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने संपविले जीवन; राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून झाडली गोळी

Numerology: 'या' मूलांकाच्या दीर-वहिनीची जोडी का मानली जाते नंबर वन? नात्यात असते हसणे, चिडवणे, प्रेम अन् विश्वास...

गरबा आणि दांडिया एकच नाही! दोन्ही नृत्यप्रकार करण्याचीही आहे वेगवेगळी वेळ; जाणून घ्या नेमका फरक काय

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

SCROLL FOR NEXT