कामोठे विकासाला गती
महापौर दालनात नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : कामोठे शहरातील विविध विकासकामांना गती देण्यासोबतच नागरिकांच्या प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी महापौर दालनात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. कामोठे प्रभाग समिती ‘क’चे सभापती रवींद्र जोशी, भाजप कामोठे शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक विकास घरत, नगरसेवक प्रदीप भगत तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन परिसरातील विविध प्रश्नांवर सविस्तर विचारविनिमय केला.
या बैठकीत कामोठे शहरातील सुरू असलेल्या आणि प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या, नागरी सुविधा आणि परिसराशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजनांवर भर देण्यात आला.
कामोठे परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता या वेळी व्यक्त करण्यात आली. विकासकामांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रलंबित कामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
कामोठेचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय वाढविण्याची गरजही या वेळी अधोरेखित करण्यात आली.
या वेळी भाजप पदाधिकारी रवी गोवारी, भाऊ भगत, हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.