जेएनपीएत वाहतूक कोंडी
कंटेनर ट्रेलर ४० ते ६० तास अडकले
उरण, ता. ७ (वार्ताहर) : उरण-जेएनपीए परिसरातील वाहतूक कोंडीने गेल्या चार-पाच दिवसांत गंभीर स्वरूप धारण केले असून, बंदरे आणि सीएफएसदरम्यान कंटेनर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कंटेनर ट्रेलर ४० ते ६० तासांपर्यंत वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याने वाहतूकदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कंटेनर वाहतूकदारांच्या विविध संघटनांनी आयात-निर्यातदार, शिपिंग लाईन्स आणि सीएफएसना ट्रेड ॲडव्हायजरी जारी केली आहे.
जेएनपीएतील विविध टर्मिनल्स आणि सीएफएसदरम्यान एक्झिम कंटेनर्सची वाहतूक सातत्याने विस्कळित होत आहे. एनएसआयसीटी टर्मिनल परिसरातील कोंडीचा साखळी परिणाम इतर टर्मिनल्सच्या वाहतुकीवरही होत असून, वाहनांच्या रांगा तब्बल १५ किलोमीटरपर्यंत लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कंटेनर ट्रेलरचा टर्नअराउंड वेळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहनांची प्रतीक्षा, चालकांचा खोळंबा, इंधनाचा अतिरिक्त खर्च आणि वाहनांच्या तैनातीतील व्यत्यय यामुळे वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही परिस्थिती वाहतूकदारांच्या चुकीमुळे नव्हे, तर उरण-जेएनपीए परिसरातील वाहतूक कोंडीमुळे निर्माण झाली आहे, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
कंटेनर फ्रेट स्टेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया, न्हावा-शेवा कंटेनर ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशन आणि न्हावा-शेवा डेपो कंटेनर असोसिएशन आदी संघटनांनी संबंधित टर्मिनल्स व बंदर प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे.
तातडीच्या उपाययोजनांची मागणी
एनएसआयसीटी गेटबाहेरील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन सुधारणा करावी, कोंडीग्रस्त भागात अतिरिक्त मनुष्यबळ व संसाधने तैनात करावीत आणि वाहनांच्या वाढत्या रांगा कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ट्रेड ॲडव्हायजरीद्वारे करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.