ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : भारत सिरीजमधील कर थकवणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कामाकरिता देशभरात बदली होणाऱ्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून या सिरीजनुसार वाहन क्रमांक दिला जातो. या सिरीजचे वाहन वापरणाऱ्यांत काही सैनिकांचाही समावेश आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखावर भारत सिरीजमधील नोंदणी झालेल्या वाहनांपैकी अनेकांनी वाहनाचा शासकीय कर भरलेला नाही. त्यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. थकित कराची रक्कम वसूल करण्याचे सरकारचे निर्देश असल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून कर थकवणारा थकबाकीदारांकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विभागाकडून अशा वाहनांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. या मोहिमेंतर्गत भारत स्टेज सिरीजमधील नोंदणीकृत वाहनधारकांना आपल्या वाहनाचा प्रलंबित कर त्वरित भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विहित मुदतीत कर न भरल्यास शासकीय नियमानुसार प्रलंबित करासह दंडाची रक्कम आकारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.