मुंबई

‘मफतलाल’च्या जमिनीचा चौथ्यांदा लिलाव

CD

कळवा, ता. ७ (बातमीदार) : सुमारे ३७ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कळव्यातील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या जमिनीचा न्यायालयाच्या आदेशाने चौथ्यांदा लिलाव होणार आहे. कंपनीकडून थकीत देणे मिळण्यासाठी वाट पाहत असलेल्या कामगारांना आता दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मफतलाल कंपनीचा एकेकाळी दबदबा होता, मात्र २७ मे १९८९ रोजी ही कंपनी बंद पडल्याने जवळपास साडेतीन हजार कामगारांच्या रोजगारावर गदा आली. त्यातील अनेक जणांचा मृत्यू, तर काही कामगारांचे नातेवाईक कंपनीकडून थकीत देणे मिळण्यासाठी न्यायालयामध्ये लढा देत आहेत. कंपनीची १२३ एकर जमीन विकून त्या पैशातून थकीत २५० कोटींची देणी कामगार व मृत वारसदारांना द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तीनवेळा लिलाव केला, मात्र खरेदीसाठी कोणती सक्षम कंपनी पुढे आली नाही. आता न्यायालयाच्या आदेशाने जमिनीचा चौथ्यांदा लिलाव होणार आहे.

मफतलाल कंपनीच्या कामगारांना पीएफ व अन्य देणे मिळावी, म्हणून मुंबई मजूर युनियनने न्यायालय दावा दाखल केला आहे. न्यायालयात नवीन मूल्य निर्धारण अहवाल सादर झाला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय वढावकर यांनी ठाण्यात बैठक घेत, या लिलाव प्रक्रियेसंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शाहांशी भेट; दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT