मुंबई

कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा ‘रेल रोको’चा प्रयत्न

CD

कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : दिल्ली येथे निवडणूक आयोगाविरोधात मंगळवारी (ता. ६) आंदोलनादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे पडसाद कल्याणमध्ये उमटले. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री उशिरा कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दिल्लीमध्ये मंगळवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला होता. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर नेत्यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर कल्याणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधींना ताब्यात घेणे, ही लोकशाहीची हत्या आहे. निवडणूक आयोग ही खासगी संस्था असल्यासारखे काम करत असून भाजप आणि निवडणूक आयोगाचे साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे. ज्ञानेशकुमार हे भाजपचे दलाल असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे, असा दावा सिंग यांनी केला. कल्याणमध्ये रेल रोकोचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : “पेपरफुटी थांबलीच पाहिजे!” विद्यार्थी आंदोलनात उतरले सुजात आंबेडकर, मागण्यांना जाहीर पाठिंबा देत सरकारवर ताशेरे

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT