मुंबई

उलव्यात २८ वर्षीय तरुण बेपत्ता

CD

उलवेतून २८ वर्षीय तरुण बेपत्ता
उलवे, ता. ७ : अटल सेतूवरून प्रतीक रासकर या २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची घटना समोर आली होती, परंतु या घटनेनंतर पोलिस, सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून युवकाची शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह किंवा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रतीक रासकर हा पुणे येथे राहण्यास असून ७ जून रोजी त्याच्या आईला बाहेर जेवणाकरिता जात असल्याचे सांगितले व तो कारने अटल सेतू येथे आला आणि पाण्यात उडी मारली. या घटनेनंतर शोध यंत्रणांनी शोधमोहीम हाती घेतली; मात्र कोणताही तपास न लागल्याने याप्रकरणी उलवे पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


मृतदेहाची ओळख पटली; उलवे पोलिसांत नोंद
उलवे, ता. ७ ः शेलघर येथील समाजमंदिराच्या हॉलजवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटली असून, विजय शिर्के (वय ५६) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी उलवे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विजय शिर्के हे फिरस्ते असून, कॅन्टीनमध्ये काम करत होते. घटनेच्या आधीच्या चार दिवसांपासून आजारी असतानाही ते दारूचे सेवन करत होते. १२ ऑगस्ट रोजी ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत उलवे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT