मुंबई

नऊ मीटरचा रस्ता प्रत्यक्षात पाच मीटरच

CD

कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : चिकणघर विभागातील किसन हाइट्स (म्हसोबा रिक्षा स्टॅन्ड) ते नामदेव विहार (मंगेशी वर्ल्ड) या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नऊ मीटर रुंदीचा डीपी रस्ता मंजूर असतानाही प्रत्यक्षात केवळ पाच ते सहा मीटरच वापरासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार कोंडी होत असून, अपघातांचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शाखाप्रमुख चेतन म्हामुणकर यांनी कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांना स्मरणपत्र देत रस्ता रुंदीकरणाची मागणी केली आहे.

मोठ्या गृहसंकुलांमुळे परिसरातील नागरी वस्ती आणि वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हामुणकर यांनी निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून डीपीप्रमाणे रस्त्याचे मार्किंग करावे, रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे तसेच नियमानुसार योग्य मोबदला देऊन रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीवर तातडीने कार्यवाही न केल्यास सोमवार (ता. १२)पासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT