चाकूहल्ल्यात श्वानाचा मृत्यू
आरोपीच्या अटकेसाठी प्राणीमित्रांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : नशेत एका व्यक्तीने श्वानावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. यात गंभीर जखमी झालेल्या ‘शेरू’ या श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्राणीमित्रांनी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्रभर ठिय्या दिला.
पूर्वेकडील आंबेडकरनगर परिसरात मंगळवारी (ता. ६) ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्राणीमित्रांच्या म्हणण्यानुसार, दीपक बाळकुटे याने नशेत शेरूवर चाकूने हल्ला केला. यात शेरू गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुविधा, अंजेलीना, आरती आणि मनोज या प्राणीमित्रांनी त्याला हॅप्पी पॉज क्लिनिकमध्ये दाखल केले. शेरूच्या जखमांवर टाके घालण्यात आले. तसेच शस्त्रक्रियाही करण्यात आली. गंभीर जखम असल्याने त्याची प्रकृती खालावली. अखेर रात्री शेरूचा मृत्यू झाला. शेरूच्या मृत्यूची माहिती मिळताच प्राणीमित्रांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीच्या अटकेची मागणी करत ठिय्या दिला. शंभरहून अधिक प्राणीमित्र यात सहभागी झाले होते. आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. शेरूला न्याय मिळावा, आरोपीला तातडीने अटक करावी, आदी मागण्या प्राणीमित्रांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.