अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : शहरातील रासायनिक प्रदूषणाला जबाबदार असलेल्या कंपन्यांसह त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाद करमरकर यांनी पोलिसांकडे केली आहे.
मोरीवली एमआयडीसी परिसरात काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी उग्र रासायनिक वास पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. कोणत्या कंपनीतून वायू सोडला जातो, कोणता रासायनिक वायू हवेत मिसळतो आणि रात्रीच्या वेळी त्याची तीव्रता का वाढते, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, तक्रारी करूनही परिस्थितीत बदल होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप असल्याचे करमरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, ३ ऑक्टोबरला मोरीवली एमआयडीसी परिसरातून मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू सोडण्यात आल्याचा दावा करमरकर यांनी केला आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी एमपीसीबीचे अधिकाऱ्यांंना संपर्क केला असता, आपण अंबरनाथमध्येच असून पाहणी करणार असल्याचे सांगितले होते, असे करमरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी हेही उपस्थित होते. प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसह एमआयडीसीतील प्रदूषणकारी कंपन्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करमरकर यांनी पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिलेल्या लेखी पत्रातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.