मुंबई

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली पोलीस महासंचालकांची भेट

CD

तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवा!
सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पोलिस महासंचालकांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या ठाण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. सहा महिन्यांत १७ जणांची हत्या झाली, तर सप्टेंबरमध्ये पाच हत्यांचा दावा करत शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी. तसेच याचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
शिष्टमंडळाने दाते यांना दिलेल्या निवेदनात हत्यांच्या घटनांचा दाखला दिला आहे. शहरात हत्यासत्र सुरू असतानाच २९ सप्टेंबरला मानपाडा येथील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या झाली. यात पोलिसांनी आतापर्यंत काही आरोपींना अटक केली असली, तरी मुख्य सूत्रधारांचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच हत्याकांडामागे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या समाजकंटकांचा हात आहे का, याचाही तपास करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. ठाण्यातील विविध भागांमध्ये अमली पदार्थांची विक्री, हुक्का पार्लर, रात्रभर सुरू असलेले पब, स्पा आणि मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या गैरप्रकारांकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. याला कोणाचे अभय आहे, याचा तपास करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात शिवसेना नेते राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेना शहरप्रमुख अमेय घाडगे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोक्कानुसार कारवाई करा
पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करावी. तसेच खटला जलद गतीने चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT