मुंबई

१० बोगस डॉक्टरांवर कारवाई

CD

१० बोगस डॉक्टरांवर कारवाई
२.२० लाखांचा औषधसाठा जप्त


चेंबूर, ता. ७ (बातमीदार) : वैद्यकीय पदवी, वैध नोंदणी तसेच आवश्यक परवाना नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांवर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांविरोधात मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. ६) कारवाई केली. यामध्ये दोन लाख २० हजार रुपयांचा औषधसाठा आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.

भांडुप, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर आणि मानखुर्द परिसरात काही व्यक्ती कोणत्याही वैद्यकीय शाखेची पदवी किंवा आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. हे व्यक्ती अलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीने उपचार करून रुग्णांकडून जादा पैसे आकारत असल्याची माहितीही तपासात समोर आली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष ७, घाटकोपरच्या पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी कारवाई केली. भांडुप येथील संतोष हेल्थ क्लिनिक आणि विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरी येथील हमदम दवाखाना आणि कोहिनूर दवाखाना, बोरिवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसर येथील दीपक हर्बल हेल्थ केअर तसेच मानखुर्द येथील समर आयुर्वेदिक दवाखाना अशा सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यादरम्यान रुग्णांना देण्यात येणारी विविध औषधे, प्रतिजैविकांच्या गोळ्या, औषधांच्या बाटल्या आणि अन्य वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. हे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ७, घाटकोपरकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT