मुंबई

''सुपर कॉप'' इमेज परत मिळवण्यासाठी वाझेने रचला कट

CD

अँटिलिया स्फोटक प्रकरण
----
‘सुपर कॉप’ प्रतिमेसाठी वाझेने रचला कट
एनआयएचा उच्च न्यायालयात दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि हे प्रकरण सोडवल्याचे भासवून ‘सुपर कॉप’ म्हणून स्वतःची ओळख पुन्हा मिळवण्यासाठी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने २०२१मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेली एसयूव्ही कार ठेवली होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी (ता. ७) उच्च न्यायालयात केला.
बनावट चकमक प्रकरणातील कथित सहभागामुळे निलंबित केलेल्या वाझेला पुन्हा सेवेत घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे वाझेला आपली प्रतिमा सुधारायची होती आणि म्हणूनच त्याने एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके असलेली कार उभी करण्याचा कट रचला. या प्रकरणाचा तपास आपल्याकडेच सोपवला जाईल याची खात्री त्याने केली. त्यानंतर आपणच हे प्रकरण सोडवले आहे, असे भासवून ‘सुपर कॉप’ म्हणून वाहवा मिळवण्याचा त्याचा उद्देश होता, अशी माहिती ‘एनआयए’चे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला दिली. 

अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर उभी केलेली कार वाझेचा व्यावसायिक मित्र मनसुख हिरेनची होती. हिरेन हा एक कमकुवत दुवा ठरू शकतो आणि आपले कारस्थान उघड करू शकतो, या भीतीतून वाझेने त्याचा खून केल्याचा दावाही एनआयएने केला. ‘अँटालिया’बाहेरील स्फोटके आणि हिरेन खून प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने वाझेला मंजूर केलेला जामीन रद्द करण्यासाठी एनआयएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी प्रकरणाची सुनावणी पूर्ण न होऊ शकल्याने न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्थगिती आदेशही सुनावणी पूर्ण होईपर्यंत कायम ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT