एमपीएससी आंदोलनावरून भाजपचा हल्लाबोल
पुण्यात रात्री राडेबाजी केल्याचा नवनाथ बन यांचा आरोप
मुंबई, ता. ७ : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर बुधवारी गंभीर आरोप केले. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध शिष्टमंडळांशी चर्चा करून मान्य केल्या आहेत, मात्र त्यानंतरही काही कार्यकर्त्यांकडून पुण्यात झुंडशाही सुरू असल्याचा दावा बन यांनी केला.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ३ आणि ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काही कार्यकर्त्यांनी धांगडधिंगा आणि राडेबाजी केल्याचे व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखविल्याचे बन यांनी सांगितले. या प्रकाराचा एमपीएससीच्या आंदोलनाशी संबंध काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवराज मोरे, बागवान आणि अन्य कार्यकर्ते नेमके विद्यार्थी आहेत का, तसेच रात्री नेमका कोणाशी वाद झाला, याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. ड्रग्ज असल्याच्या संशयावरून मारहाण करण्याचा अधिकार कोणाला दिला, असा प्रश्नही बन यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. धमक्या देऊनही सत्य समोर आणण्यापासून आपण मागे हटणार नसल्याचेही बन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.