मराठा मंडळाच्या निवडणुकीत ‘अजिंक्य पॅनेल’चे वर्चस्व
शिवाजी सावंत अध्यक्षपदी; कार्यकारिणीच्या सर्व १४ जागांवर विजय
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) : मुलुंड येथील मराठा समाजाचे मानाचे केंद्र असलेल्या मराठा मंडळाच्या २०२६-२९ या कार्यकाळासाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘अजिंक्य पॅनेल’ने अध्यक्षपदासह कार्यकारिणीच्या सर्व १४ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. मुलुंड पूर्वेतील मराठा मंडळ सभागृहात रविवारी (ता. ४) निवडणूक झाली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अजिंक्य पॅनेल’चे शिवाजी जगन्नाथ सावंत यांनी ५५८ मते मिळवत विजय मिळविला. एकूण ८०० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कार्यकारिणी सदस्यपदासाठी ७७० मते नोंदविण्यात आली. ‘अजिंक्य पॅनेल’च्या सर्व १४ उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. शुभदा योगेश म्हामुणकर यांनी ५३४ मते मिळवत सर्वाधिक मते मिळविली. संतोष परशुराम सावंत यांना ५२८, तर विनय नारायण शेलार आणि सोनाली संतोष सावंत यांना प्रत्येकी ५१९ मते मिळाली.
रमेश लक्ष्मणराव शिंदे, दीपक सगुण राणे, सचिन भालचंद्र पाटील, रवींद्र वासुदेव सावंत, संतोष गंगाराम महाडिक, वैभव अरविंद राणे, अरुण विठ्ठल चव्हाण, दीपक धोंडीराम सावंत, मनोहर जनार्दन जुन्नरे आणि नीलेश शंकर सुर्वे हेही विजयी झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि सभासदांनी श्री तुळजाभवानीची ओटी भरून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी हा विजय सभासदांच्या विश्वासाचा आणि समाजाच्या एकजुटीचा असल्याचे सांगत मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.