मुंबई

उल्हासनगरच्या राजकारणाला दादागिरीची किनार

CD

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ८ : विकासकामांपेक्षा राजकीय आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ, धमक्या आणि एकमेकांना दिली जाणारी आव्हाने यांचीच चर्चा सध्या शहरात रंगली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर आरोप आणि तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सत्तेतील या मित्रपक्षांमधील स्थानिक संघर्षाने गंभीर वळण घेतले आहे.

भाजपकडून पप्पू कलानी यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर त्याला प्रत्युत्तर देताना महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपचे कपिल अडसूळ यांनी कमलेश निकम यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून निकम यांनी महापालिकेत समर्थकांसह उपस्थित राहत अडसूळ यांना ‘मी आलो, येऊन दाखवा’ असे आव्हान दिल्याचे समोर आले. या प्रकारानंतर दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या.
या संघर्षामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वाद सभागृहातून रस्त्यावर आणि त्यानंतर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त आहे.


कलानी यांच्यावर टीका
या संघर्षाच्या निमित्ताने उल्हासनगरच्या राजकारणातील कलानी कुटुंबाच्या प्रभावाची चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्याकडूनही कलानी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विकासाचे प्रश्न मागे पडणार?
शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांचे प्रश्न कायम असताना नेत्यांमधील संघर्षाला मिळणारी प्रसिद्धी नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकमेकांना आव्हाने देण्याऐवजी शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

SCROLL FOR NEXT