महात्मा गांधींच्या पुतळ्याभोवती वाहनांचे पार्किंग
प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजी
उरण, ता. ८ (बातमीदार) : शहरातील मध्यवर्ती महात्मा गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांचे सर्रास पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या स्मारकाच्या परिसराला पार्किंग झोनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या विद्रूपीकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरात गांधीजींच्या विचारांचे स्मरण केले जात असताना उरणमधील गांधी चौकातील पुतळ्याभोवती वाहनांचे पार्किंग कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे गांधी जयंतीच्या दिवशीही नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी वाहन पार्किंग रोखण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
वाहनांवर कारवाईची मागणी
१ प्रशासनाने या ठिकाणी स्पष्ट सूचनाफलक लावणे, वाहनांना प्रतिबंध करणे, त्याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या मदतीने अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
२ महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पावित्र्य राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यामुळे परिसराचे सुशोभीकरण व संवर्धन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तेथे वाहने पार्किंग करणे हे फार चुकीचे आहे. नागरिकांना आम्ही अनेक वेळा सांगितले परंतु, तेथेच वाहने पार्किंग करतात. आम्ही यावर ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करतो.
- समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.