मुंबई

वडपे-पडघा मार्गावर धुळीचे साम्राज्य

CD

पडघा, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी तालुका ग्रामीण भागातील वडपे ते पडघा टोलनाका, समृद्धी महामार्ग जंक्शन आणि पडघा-कल्याण मार्गाची दुरवस्था झाली असून, धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या तिन्ही मार्गांची तातडीने दुरुस्ती करून धुळीवर नियंत्रण मिळवावे आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष दिलशाद शेख यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे केली.

शेख यांनी याबाबत बनसोडे यांना निवेदन दिले. वडपे ते पडघा टोलनाका मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, समृद्धी महामार्ग जंक्शन परिसरातील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांसह दुचाकीस्वारांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पडघा-कल्याण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तिन्ही मार्गांवर विशेषतः सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना तासन्‌तास अडकून पडावे लागते. त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, धुळीवर नियंत्रणासाठी उपाययोजना आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत, अशी मागणी शेख यांनी केली.

आश्वासन
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षित प्रवास लक्षात घेता या गंभीर समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावर बनसोडे यांनी प्रश्नाची दखल घेऊन संबंधित यंत्रणांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SCROLL FOR NEXT