मुंबई

निवडणूक आयोगाविरोधात भिवंडीत उद्या ‘लाँग मार्च’

CD

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने गुरुवारी (ता. ९) ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मोर्चाची माहिती देण्यात आली. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातही ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शेतकरी कामगार पक्ष सहभागी झाले होते. मतचोरी, महाराष्ट्रातील एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन, विविध परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित गैरप्रकार आदी प्रश्नांविरोधातील आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढणार आहे. याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष आबिद खान, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी, ठाकरे गटाचे संपर्क संघटक मनोज गगे, कॉम्रेड विजय कांबळे, अशोक फडतरे, वैशाली मेस्त्री, इक्बाल अहमद, रियाज शेख, अरुण पाटील, मनोज श्रीवास्तव, प्रदीप बोडके, गजेंद्र गुळवी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

SCROLL FOR NEXT