मुंबई

शिरवणे गावातील विहिरींच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

CD

शिरवणेतील विहिरी दूषित
स्वच्छता करण्याची माधुरी सुतारांची मागणी
नेरूळ, ता. ८ (बातमीदार) : प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत शिरवणे गाव परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तीन विहिरींची तातडीने स्वच्छता व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका माधुरी सुतार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नवी मुंबई पालिकेच्या संबंधित विभागाकडे लेखी निवेदन दिले आहे.
शिरवणे परिसरातील काही विहिरींमध्ये पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त झाले असून, त्यात निर्माल्य, कचरा तसेच इतर घाण साचल्याचे आढळून आले आहे. काही विहिरींमध्ये मृत मासेही आढळल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विहिरींची तातडीने स्वच्छता करून पाण्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाची दखल घेत नवी मुंबई महापालिकेच्या ‘ब’ विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (पाणीपुरवठा, नेरूळ) किरणकुमार सानप यांनी कर्मचाऱ्यांसह जुना ठाणे-बेलापूर रोड, शिरवणे गाव येथील विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विहिरीची सद्यस्थिती, परिसरातील अस्वच्छता तसेच साचलेले निर्माल्य व कचऱ्याची पाहणी करण्यात आली.
शिरवणे गावातील तीन विहिरी व त्यांच्या परिसराची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी विहिरींमध्ये कचरा किंवा निर्माल्य टाकू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

विहिरी सील करण्याच्या सूचना
विहिरींच्या सुरक्षिततेसाठी त्यावर पूर्णतः वेल्डिंग करून त्या सील करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा विहिरींमध्ये कचरा किंवा निर्माल्य टाकण्यास प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.
नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने नियमित पाहणी व स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांनीही जलस्रोतांमध्ये कचरा व निर्माल्य न टाकता त्यांची स्वच्छता राखावी, असे आवाहन माधुरी सुतार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

SCROLL FOR NEXT