मुंबई

महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर

CD

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग समिती ‘ड’मध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. दि. बा. पाटील विद्यालयात झालेल्या शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
या वेळी सभागृह नेते प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती ‘ड’चे सभापती अजय बहिरा, महापालिका सदस्य सुमीत झुंजारराव, मनीषा म्हात्रे, आर्या जाधव यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
चाळिशीनंतर महिलांमध्ये सांधेदुखी, आमवात यांसारख्या समस्या वाढत असल्याने आवश्यक तपासण्या व आरोग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, या उद्देशाने शिबिर आयोजित केल्याचे ममता म्हात्रे यांनी सांगितले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र व दंतरोग, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, प्रसूतीपूर्व तपासणी, हिमोग्लोबिन, क्षयरोग, मलेरिया व डेंगी आदी तपासण्या करण्यात आल्या. २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला, तर २६६ महिलांची पॅप स्मीअर तपासणी करण्यात आली.

पुढील शिबिरांचे नियोजन
८ ऑक्टोबर: प्रभाग ‘अ’, काळभैरव सभागृह, कळंबोली
९ ऑक्टोबर: प्रभाग ‘क’, प्रभाग समिती कार्यालय, कामोठे
१० ऑक्टोबर: प्रभाग ‘ब’, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सेक्टर १५, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

SCROLL FOR NEXT