डासांच्या प्रादुर्भावाविरोधात धुरीकरण
७ ते १३ ऑक्टोबरदरम्यान पालिकेची मोहीम
नेरूळ, ता. ८ (बातमीदार) : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत स्वच्छतेसोबत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पालिका आरोग्य विभागाने राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विशेष धुरीकरण मोहीम हाती घेतली आहे.
नवी मुंबईत डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित डासअळीनाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरण केले जाते. प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात आठवड्यातून एकदा फवारणी व धुरीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष मोहिमेअंतर्गत ७ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सहा गटांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात येणार आहे.
मोहिमेची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सीबीडी बेलापूर येथून करण्यात आली. या वेळी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ उपस्थित होते.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. धुरीकरणाबाबत तक्रार अथवा अडचण असल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.