इंदिरा गांधी महाविद्यालयाचे सुयश; युवा महोत्सवात सहा पारितोषिके
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव २०२६-२७ ची विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी नुकतीच झाली. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या महाविद्यालयांची १२ विभागांमध्ये विभागणी करून विभागनिहाय प्राथमिक फेरीत पारितोषिक संपादित करणाऱ्या महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती.
या युवा महोत्सवात मुंबई विभाग-२ चे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चार पारितोषिके पटकावली. यात शास्त्रीय वाद्यवादन (तालवाद्य) प्रथम क्रमांक कार्तिक कदम, कथाकथन (मराठी) तृतीय क्रमांक मैथिली मोंडे, कथाकथन (हिंदी) उत्तेजनार्थ भावना पाटील, भारतीय लोकनृत्य उत्तेजनार्थ अक्षता मोरे, प्रिया मिश्रा, कीर्ती पारकर, रिया गुप्ता, स्वरा लवंदे, अमृता रांजणे, श्रद्धा निकम, खुशी देशमुख, अनिष्का वाडेकर यांनी पारितोषिके पटकावली.
याशिवाय संस्थेच्या उरण येथील शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालयाच्या हर्षल म्हात्रे याने पोस्टर निर्मितीत तृतीय क्रमांक पटकावला. तर संस्थेच्या टागोरनगर, विक्रोळी (पूर्व) येथील संदेश महाविद्यालयाच्या सुशील सदाशिव कोरवी याने पाश्चिमात्य वाद्यवादनामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावला. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या साक्षी संजय मोरे हिने रौप्यपदक पटकावले, तर पालघर येथे झालेल्या विभागस्तरीय क्रॉस कन्ट्री स्पर्धेत अजय प्रकाश मदने याने कांस्यपदक पटकावले असून, त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या मुंबई विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.