मुंबई

धोकादायक इमारतीमध्ये पुन्हा वीज मीटर

CD

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : महापालिकेने धोकादायक इमारतीचा पाणीपुरवठा व वीज खंडित केली, तिलाच स्थानिक वीज कंपनीने नवीन वीज मीटर लावल्याची घटना रावजीनगर भागात घडली आहे. या घटनेने परिसरातील जागरूक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील कल्याणरोड रावजी नगरमधील प्रभाग समिती क्र.२ येथील पालिका घर क्र. २३९ ही आरसीसी इमारत असून पालिकेने १३ एप्रिल रोजी धोकादायक म्हणून घोषित करून ती निष्कासित करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे या धोकादायक इमारतीचा नागरिकांनी वापर करू नये, म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा खंडित करून शहरास खासगी कंपनीमार्फत वीज पुरवठा खंडित केला होता. परंतु पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी इमारत निष्कासित करण्याची कारवाई न केल्याने या इमारतीमध्ये संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नव्याने दोन मीटर लावून वीजपुरवठा नियमित केला आहे. या प्रकरणी पालिकेच्या प्रभाग समिती क्र.२ च्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली आहे.

दुर्घटनेतून धडा नाहीच
काही महिन्यांपूर्वी नारपोली-भंडारी कंपाउंडमधील कोहिनूर ही धोकादायक इमारत कोसळून १० नागरिकांचा मृत्यू झाला. या इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करूनदेखील इमारतीमधील नागरिकांना इमारतीबाहेर काढून निष्कासित करण्याची कारवाई प्रभाग अधिकाऱ्यांनी केली नव्हती.

संबंधित धोकादायक इमारतीमध्ये खासगी कंपनीमार्फत नव्याने दोन वीज मीटर लावल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पालिकेमार्फत कंपनीला पत्र पाठवून कारवाई करण्यात येणार आहे.
- विनोद मनोरे, प्रभाग अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

SCROLL FOR NEXT