मुंबई

महावितरणच्या ‘डीपी’ला बांधकामाचा विळखा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : जांभळीनाका येथील खाद्यपदार्थाच्या दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेने शहरातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीच्या पाहणीच्यावेळी दुकानाशेजारील महावितरणची डीपी चक्क बांधकाम करून बंदिस्त केल्याचे निदर्शनास आले. विद्युत यंत्रणेला अशा पद्धतीने विळखा घातल्याने आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाण्यातील जांभळीनाका येथील ‘प्रीती सँडविच’ दुकानाला मंगळवारी (ता. ६) रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. जवाहर बाग अग्निशमन केंद्राच्या जवानांनी दोन अग्निशमन वाहने आणि एका रेस्क्यू वाहनाच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत दुकानासह महावितरणच्या डीपीचे मोठे नुकसान झाले, तर शेजारील ‘न्यू नाईक गिफ्ट शॉप’च्या पुढील भागालाही झळ बसली. आग विझवल्यानंतरच्या पाहणीत डीपीभोवती अनधिकृत बांधकाम करून ती बंदिस्त केल्याचे समोर आले. विद्युत यंत्रणेजवळ अशा प्रकारे बांधकाम करण्यास परवानगी आहे का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या बांधकामाकडे आतापर्यंत संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष कसे झाले, तसेच जबाबदारांवर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

पाहणी करण्याची मागणी
या संदर्भात प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संख्ये यांना विचारले असता, त्यांनी पालिका आयुक्तांकडे थेट तक्रार केली असल्याचे सांगितले. डीपीभोवतीचे बांधकाम, पदपथांवरील अतिक्रमणे आणि दुकानांसमोरील बेकायदा शेड यांची पाहणी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी संबंधित विभागाला पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आयुक्तांनी आश्वासन दिल्याची माहिती संख्ये यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

Latest Marathi News Live Update: अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

SCROLL FOR NEXT