मुंबई

दुर्लक्षित घटकांसाठी ‘एचपीव्ही’चे कवच

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : कर्करोग प्रतिबंधाच्या लढ्याला सामाजिक समावेशकतेची जोड देत कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष एचपीव्ही लसीकरण शिबिर नुकतेच घेण्यात आले. या उपक्रमात तब्बल ८१८ जणांचे एका दिवसात लसीकरण करण्यात आले. यामध्ये तृतीयपंथी आणि एलजीबीटीक्यू समुदायातील सुमारे २५० लाभार्थी सहभागी झाले. या संस्थेत एका दिवसात झालेल्या एचपीव्ही लसीकरणाचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक प्रतिसाद ठरला.

मध्यवर्ती मार्ड आणि आरजीएमसी-सीएसएमएच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला मॉक कॅन्सर सकेअर फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ मुलुंड आणि रोटरी क्लब ऑफ जुहू यांचे सहकार्य लाभले. आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनच्या पाठबळातून हा उपक्रम राबविण्यात आला. एलजीबीटीक्यू समुदायापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचविण्यासाठी स्वतंत्र जनजागृती आणि संपर्क मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे या समुदायातील मोठ्या संख्येने लाभार्थी शिबिरापर्यंत पोहोचले. कर्करोग प्रतिबंधाच्या उपाययोजनांमध्ये आरोग्यसेवा सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.

एचपीव्ही संसर्गाबाबत जनजागृती
शिबिरादरम्यान एचपीव्ही संसर्ग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तसेच कर्करोग प्रतिबंधामध्ये एचपीव्ही लसीकरणाची भूमिका याबाबतही जनजागृती करण्यात आली. आरोग्य कर्मचारी, परिचारिका विद्यार्थी, वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही लसीकरणाचा लाभ देण्यात आला. समाजातील विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा संदेश देणे, हे शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले, अशी माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: उदगीरमध्ये भरदिवसा दोन घरांवर डल्ला; सहा लाखांचा ऐवज लंपास

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT