सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवावा, या मागणीसाठी ठाण्यात आज (ता. ८) काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले. दिल्लीतील आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेध करण्यात आला. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
ठाणे काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. दिल्लीमध्ये बुधवारी (ता. ७) झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी काँग्रेसचा लढा सुरू राहणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांशी चर्चा करण्याऐवजी त्यांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.