मुंबई

स्मार्ट मीटरचा विरोध टोकाला

CD

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : स्मार्ट मीटर बसविण्यावरून उल्हासनगरात सुरू असलेला विरोध आता वीज कर्मचाऱ्यांना थेट बारमध्ये कोंडून ठेवण्यापर्यंत पोहोचल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅम्प ५ मधील एका बारमध्ये जुना मीटर बदलून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रवेशद्वाराला आतून कुलूप ठोकण्यात आले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हॉटेलच्या व्यवस्थापकासह वेटरवर हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर शहरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोधाचे ग्रहण लागले आहे. कॅम्प क्रमांक ५ येथील गांधी रोडवरील अब्बु बार हॉटेलमध्ये बुधवारी (ता. ७) दुपारी हा प्रकार घडला. सहाय्यक अभियंता तन्वीर हिंदुराव हे प्रधान तंत्रज्ज्ञ दिलीप भिल, विद्युत सहाय्यक कोमल टेंगडे व ज्योती कुंभारे, बाह्यस्रोत कर्मचारी रमाकांत पाटील आणि सुशांत जेटे यांच्यासह बारमधील नवीन स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेले होते. त्या वेळी वेटर रंजीत ठाकुर याने व्यवस्थापक विवेक गुप्ता याला फोन केला. हिंदुराव यांनी गुप्ता याला फोनवर स्मार्ट मीटर बसविण्यासंदर्भातील शासन निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मीटर बदलण्याचे काम पूर्ण केले, मात्र कर्मचारी बाहेर पडत असताना गुप्ता याच्या सांगण्यावरून विवेकने हॉटेलच्या गेटला आतून कुलूप लावून त्यांना बाहेर जाण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

'या' लोकांपासून वेळीच दूर राहा! चाणक्य नीतीत सांगितले आहेत वाईट काळाचे संकेत

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात अतिक्रमण निरीक्षकाला लाथ मारून मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT