मासिक पाळी : स्वच्छता, जागरूकतेचा धडा
मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती
जुचंद्र, ता. ८ (बातमीदार) : किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी निगडित मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करून स्वच्छता आणि सुरक्षित व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनियर कॉलेजमध्ये विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत निरामय हेल्थ फाउंडेशन आणि सीसीआयएल कंपनीच्या संयुक्त सहकार्याने शाळेत यापूर्वी बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या योग्य विल्हेवाटीसाठी उपलब्ध करून दिलेल्या बंद कचरापेट्यांची तपासणी करण्यात आली. बंद किंवा नादुरुस्त वेंडिंग मशीनची दुरुस्ती करून ती कार्यान्वित करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींच्या गरजेनुसार सॅनिटरी पॅडचा साठा शाळेला विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला.
मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षित मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत योग्य माहिती व जागरूकता निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थिनींना सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि निरोगी जीवन जगण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमास आरोग्यप्रमुख मिताली म्हात्रे यांच्यासह सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक जगताप, रायगड विभागाचे विभागीय अधिकारी आणि पर्यवेक्षिका कविता पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.