मुंबई

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार

CD

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार
एनपीएस रद्द करण्याची मागणी; महापालिकेत तीव्र संघर्षाचा इशारा
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) : राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारिका, परिसेविका, तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक, शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी मुंबई महापालिका कामगार-कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नुकताच भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास विविध कर्मचारी संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात एनपीएसमुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला. २०१०-११ ते २०२४-२५ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सुमारे ६,२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम विविध आर्थिक संस्थांमध्ये गुंतविली जाणार असल्याने भविष्यात कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका संघटनांनी मांडली.
महापालिकेत नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा विविध संघटनांच्या नेत्यांनी दिला. तसेच भरघोस सानुग्रह अनुदान (बोनस) मिळविण्यासाठी सर्व संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन बाबा कदम यांनी केले.
मेळाव्यास कामगार नेते अशोक जाधव, वामन कविस्कर, शशांक राव, दिवाकर दळवी, रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, के. पी. नाईक, नवनाथ घाडगे, त्रिशिला कांबळे, गजुला, प्रकाश जाधव, यशवंत धुरी, दीपक बांबडे, सुनील चिटणीस, रंजना नेवाळकर, हेमंत कदम यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी लवकरच सर्व संघटनांच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

'या' लोकांपासून वेळीच दूर राहा! चाणक्य नीतीत सांगितले आहेत वाईट काळाचे संकेत

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात अतिक्रमण निरीक्षकाला लाथ मारून मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT