मुंबई

उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश

CD

कुपोषणमुक्तीसाठी त्रिसूत्री
उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील कुपोषण निर्मूलनाला अधिक गती देण्यासाठी आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार केला आहे. कुपोषित बालकांना वेळेत आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना कुपोषण निर्मूलन कृती दलाचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या.
मुंबई येथील आयुक्तालयात डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कुपोषण निर्मूलनाबाबत बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात राज्यातील कुपोषणाची सद्यःस्थिती, बालकांमधील रक्तक्षय तसेच विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील गंभीर तीव्र कुपोषित बालकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात आला. “कुपोषण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी एकात्मिक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे,” असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
बैठकीस बैठकीस आयुक्त आरोग्य संजय काटकर, आयुक्त आरोग्यसेवा (शहर) सुनील भोकरे, आयुक्त महिला व बालविकास सरदेसाई, उपायुक्त लोंढे, संचालक प्राथमिक डॉ. विजय कंदेवाड, सहसचिव शेडके तसेच आदिवासी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SCROLL FOR NEXT