मुंबई

पाणी प्रश्नावर आमदार मंदा म्हात्रे आक्रमक

CD

पाणीप्रश्नावर आमदार मंदा म्हात्रे आक्रमक
महापालिका आयुक्तांनी बोलावली प्रशासनाची तातडीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : शहरातील वाढती पाणीटंचाई, नागरिकांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, विकसकांकडून होणारा कथित अनधिकृत पाणीउपसा तसेच पाण्याचा गैरवापर या प्रश्नांवर आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील सर्वसामान्य नागरिक, गावठाणे, झोपडपट्टी परिसर तसेच विविध सोसायट्यांमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे मोठ्या बांधकाम प्रकल्पांकडून पाण्याचा अनधिकृत वापर होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक नागरिकाला समान आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी केली.
बैठकीमध्ये मुख्य जलवाहिन्यांवर हाय-प्रेशर मोटारी लावून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या विकसकांवर कारवाई, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, एमआयडीसी परिसरातील पाण्याचा गैरवापर, पाणीचोरीच्या तक्रारी तसेच शहरातील विविध भागांमध्ये समान दाबाने पाणीपुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही आवश्यक नियंत्रण ठेवण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येता कामा नये. नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचा अनधिकृत वापर किंवा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत होऊ नये. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि नियमित पाणी मिळणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका मंदा म्हात्रे यांनी मांडली.
महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींची दखल घेऊन आवश्यक तपासणी व कार्यवाही करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. या बैठकीस आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त शिरीष अरदवाड, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, समाज विकास विभागाचे उपायुक्त कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT