मुंबई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट;

CD

एकनाथ शिंदे, मीनाक्षी शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
फेसबुकवरील पोस्टप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी पोलिसांत याबाबत तक्रार केली असून, ‘तुषार राणे’ या नावाच्या फेसबुक खात्यावरून ही पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी आनंद आश्रम येथे असताना त्यांना समाजमाध्यमांवर मीनाक्षी शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी गंभीर आरोप तसेच अश्लील आशय असलेली पोस्ट आढळली. या पोस्टमध्ये अमली पदार्थांचा व्यवसाय, खंडणी आणि सुपारी यांसारखे गंभीर आरोप करण्यात आल्याचे तसेच मीनाक्षी शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या पोस्टमुळे शिंदे यांची बदनामी होत असून, शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. तसेच पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित पोस्ट आणि इतर सोशल मीडिया खात्यांवर तिचा प्रसार तातडीने थांबवून पोस्ट करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT