मुंबई

पूर्णेकर हत्याकांड; यादव, पवारला पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी

CD

पूर्णेकर हत्याकांड
यादव, पवारला पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना गुरुवारी (ता. ८) ठाणे न्यायालयाने पुन्हा १३ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या हत्येचा कट पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. आरोपींनी हल्ल्यात दोन पिस्तूल आणि तीन चॉपरचा वापर झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रदीप पूर्णेकर यांच्यावर २९ सप्टेंबरला पाच जणांनी गोळीबार करून चॉपरने हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पप्प्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक झाली. संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि एक अनोळखी हेल्मेटधारी संशयित अद्याप फरार आहेत. या हल्ल्यात वापरलेल्या तीन दुचाकी, एक चारचाकी कार तसेच एक पिस्तूल आणि मोबाईल फोन असा ऐवज जप्त केले. हल्ल्यातील एक पिस्तूल आणि तीन चॉपर याचा शोध घ्यावयाचा असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. यादव आणि पवार यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना गुरुवारी (ता. ८) न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी फरार संशयितांचा शोध आणि अन्य बाबींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, पूर्णेकर यांच्या वकिलांनी आरोपींना एकत्र पाहिले असल्याचा दावा न्यायालयात केला, तर पप्प्या शिंदेची पोलिस कोठडी शुक्रवारी (ता. ९) संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT