मुंबई

‘महागाई कमी झालीच पाहिजे; महिलांना त्यांचे अधिकार मिळालेच पाहिजेत’ – सुप्रिया सुळे कल्याणमधील महिला मेळाव्यात सरकारवर टीका;

CD

‘महिलांना त्यांचे अधिकार मिळावे’
लाडकी बहीण, महिला आरक्षणावर सुप्रिया सुळेंची नाराजी

कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : ‘‘महागाई, बेरोजगारी कमी झाली का? महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महिला आरक्षणाच्या विधेयकाची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही?” असे सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. ८) कल्याणमध्ये सरकारवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कल्याण-मुरबाड येथील कांबा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, प्रवक्ते महेश तपासे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक भरत गोंधळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत सुळे यांनी महिलांना निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘आता तुमच्या मतांची गरज नसल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे कापले. २०२९ मध्ये पुन्हा तुमची नावे या योजनेत टाकतील,’’ असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक महिलेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

SCROLL FOR NEXT