मुंबई

उड्डाणपूलबाधितांना मोबदला मिळणार

CD

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली-चोळेगाव उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या भूमिपुत्र जागामालकांना नियमानुसार योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दिले आहे. नगरसेविका शारदा चौधरी यांच्या पुढाकाराने बाधित जागामालकांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीत जागामालकांच्या समस्या आणि मोबदल्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

डोंबिवलीतील कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाकुर्ली उड्डाणपुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, उड्डाणपुलाच्या कामासाठी काही भूमिपुत्रांच्या जागा बाधित होत असल्याने त्यांच्या हक्काचा मोबदला आणि पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शारदा चौधरी आणि भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी बाधित जागामालकांसह अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेतली. या वेळी बाधित जागामालकांनी आपल्या समस्या मांडत योग्य मोबदला मिळण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान भूमिपुत्रांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि बाधित जागामालकांना नियमानुसार योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT