पेणमध्ये २५ ग्रामपंचायती निवडणुकीच्या प्रतीक्षेत
डिसेंबर किंवा जानेवारी २०२७ मध्ये मतदान होण्याची शक्यता
पेण, ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने या गावांचा कारभार सध्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहे. निवडणुका कधी होणार, याकडे स्थानिक राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७ मध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने गेल्या दीड ते दोन वर्षांपासून काही ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे. पेण तालुक्यातील निधवली, झोतीरपाडा, कुहीरे, अंतोरे, पाबळ, गागुदे खुर्द, जावळी, वढाव, वरेडी, रावे, जिर्णे, शिर्की, शेडाशी, आंबेघर, करंबेळी छात्तीसी, कामार्ली, शिहू, जोहे, कांदळे, बोर्झे, उंबर्डे, काळेश्री, बेणसे, खारपाले, कासू आणि वाकरूळ या गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या आहेत.
निवडणुका वेळेत न झाल्याने ग्रामीण भागातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेकडे ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. गावपातळीवरील राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम सुरू असून, त्यातील अंतिम याद्या नोव्हेंबरच्या आसपास प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो, मात्र पेण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या अधिकृत तारखा अद्याप निश्चित झालेल्या नसल्याने डिसेंबर किंवा जानेवारीतील संभाव्य निवडणुकांबाबत स्पष्टता येण्यासाठी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ग्रामीण कारभारासमोरील प्रश्न
निवडणुका रखडल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकीय यंत्रणेमार्फत चालवला जात आहे. स्थानिक विकासकामे, गावांच्या गरजा आणि निर्णयप्रक्रिया यांबाबत लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.