मुंबई

‘सगळ्यांचेच हेतू चांगले नसतात’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबत सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिसांच्या वतीने ‘सगळ्यांचेच हेतू चांगले नसतात’ या सायबर जनजागृती उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्टोबर हा सायबर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जात असून, त्यानिमित्त महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय सायबर समन्वय केंद्र आणि महाराष्ट्र सायबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. डिजिटल अरेस्ट, फिशिंग, ओटीपी फसवणूक, एपीके लिंकद्वारे होणारी फसवणूक, शेअर ट्रेडिंगमधील घोटाळे, बनावट कर्ज ॲप्स आणि केवायसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांना सावध करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेंतर्गत ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील शाळा-महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे डुंबरे यांनी सांगितले.

पथनाट्य, डिजिटल माध्यमांद्वारे प्रचार, सायबर गुन्हे जनजागृतीवर आधारित रील्स स्पर्धा आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या देखावा स्पर्धेच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त निलीमा पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Chhatrapati Sambhajinagar Accident: खड्डा चुकविताना ट्रॅक्टर उलटला; ३९ वर्षीय शेतकऱ्याचा चाकाखाली आल्याने मृत्यू, महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT