मुंबई

सार्वजनिकपेक्षा घरगुती मूर्तींची संख्या अधिक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक आणि खासगी मिळून एकूण चार हजार १६ दुर्गादेवी मूर्तींची स्थापना होणार आहे. यामध्ये ६३५ सार्वजनिक, तर ३,३८१ खासगी मूर्तींचा समावेश आहे. याशिवाय सार्वजनिक आणि खासगी स्वरूपात घटस्थापना, फोटो-प्रतिमा, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम आणि रामलीलेचे आयोजनही करण्यात येणार आहे. यंदा सार्वजनिक मूर्तींपेक्षा घरगुती देवीच्या मूर्तींची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमध्ये
नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. विशेषतः ठाण्यातील टेंभीनाक्यावरील अंबे माता देवीच्या दर्शनाला आणि यावेळी उभारण्यात येणाऱ्या मंदिर तसेच रोषणाई पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी दरवर्षी पाहण्यास मिळते. अनेक ठिकाणी मंडप उभारून सार्वजनिक दुर्गामूर्तींची स्थापना केली जाते, तर घरगुती स्वरूपातही देवीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाच्या आकडेवारीत सार्वजनिक मूर्तींच्या तुलनेत खासगी मूर्तींची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. विशेषतः कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळांत खासगी मूर्तींची संख्या लक्षणीय आहे.

घटस्थापना आणि धार्मिक कार्यक्रमांचीही तयारी
दुर्गामूर्तींच्या स्थापनेबरोबरच घट-कलश स्थापनेची परंपराही मोठ्या प्रमाणावर जपली जाते. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक स्वरूपात ६० आणि खासगी स्वरुपात ८,५८३ घट-कलशांची नोंद आहे. याशिवाय सार्वजनिक ९९ आणि खासगी स्वरुपातील ३२१ फोटो अथवा प्रतिमांची नोंद करण्यात आली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत ७५ मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जाणार असून, दोन ठिकाणी रामलीलेचे आयोजन होणार आहे.

तिथीनुसार नवरात्रोत्सवाचे नियोजन
नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये तिथीनुसार विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या उत्सवात ललितापंचमी, दुर्गाष्टमी आणि विजयादशमीला विशेष महत्त्व असते. विजयादशमीच्या दिवशी दुर्गादेवीचे विसर्जन तसेच काही ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. उत्सवाच्या काळात मंडप, धार्मिक स्थळे आणि विसर्जन मिरवणुकांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

परिमंडळनिहाय मूर्ती...
परिमंडळ सार्वजनिक घरगुती
कल्याण १,५७ २,७२५
उल्हासनगर १२४ ९९
ठाणे १०८ २३१
भिवंडी ९७ १९६
वागळे इस्टेट १४९ १३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT