मुंबई

बीपीएडच्या तिसऱ्या यादीत १ हजार ५२२ विद्यार्थ्यांना संधी

CD

‘बीपीएड’ची तिसरी यादी जाहीर
मुंबई, ता. ९ : बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीत उपलब्ध जागांची संख्या चार हजार ४७८ होती, त्यापैकी एक हजार ५२२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर तिसऱ्या फेरीसाठी एक हजार ७२५ विद्यार्थ्यांनी पसंती दाखविली होती. राज्यात ‘बीपीएड’च्या प्रवेशासाठी चार हजार ०३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत एक हजार ७२५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. तिसऱ्या फेरीच्या वाटपासाठी राज्यात ५५ बीपीएड महाविद्यालयात चार हजार ४७८ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी एक हजार ५२२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी झालेल्या प्रवेशात पहिल्या फेरीत १४०४ व दुसऱ्या फेरीत १३७ विद्यार्थ्यांनी बीपीएड महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता दिनांक १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर १२ ऑक्टोबरला रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Vote Theft : 'राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे'; राहुल गांधींचा मोठा दावा, CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

MPSC Student Agitation : पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे; आंदोलकांचा पोलिसांवर आरोप

Pune News : मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून झोपला; आयटी अभियंता प्राणास मुकला, दोन दिवस फ्लॅटमध्ये पडून होता मृतदेह

Ganja Seized : उमरगा सीमेवर पोलीस अन् अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ३.२४ कोटींचा ६४२ किलो गांजा जप्त

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT