मुंबई

‘बिग बिलियन डेज’ला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद

CD

‘बिग बिलियन डेज’ला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद

बंगळूर, ता. १० : फ्लिपकार्टच्या ‘द बिग बिलियन डेज’ या सणासुदीच्या खरेदी महोत्सवाला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच तासात एका मिनिटाला एकाच वेळी ६३ लाख वापरकर्ते सक्रिय झाले. सामान्य दिवसांच्या तुलनेत खरेदीत सहा पटींहून अधिक वाढ झाली, तर नवीन ग्राहकांची संख्या ३४ टक्क्यांनी वाढली. जवळपास ६० टक्के मागणी बिगरमहानगरी भागांतून आली.

छोट्या शहरांतून स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांना मोठी मागणी होती. मोठ्या उपकरणांच्या विक्रीत ३० टक्के, तर टॅब्लेटच्या विक्रीत ७३ टक्के वाढ झाली. सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीतही ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. पुरुषांच्या परफ्यूमची दर मिनिटाला १,६०० हून अधिक युनिट्स विक्री झाली. फ्लिपकार्ट मिनिट्स या जलद वितरण सेवेवरील ऑर्डर्समध्ये सामान्य दिवसांच्या तुलनेत ३.५ पट वाढ झाली, तर नवीन ग्राहकांची संख्या ११ पटींनी वाढली. नवी दिल्लीतील एका ग्राहकाला आयफोन १७ अवघ्या ३.४ मिनिटांत पोहोचविण्यात आला. खरेदीसाठी व्हिडिओ आणि थेट प्रक्षेपणालाही प्रतिसाद मिळाला. व्हॉइस सर्च करणाऱ्यांपैकी ६४ टक्के ग्राहक टियर-२ आणि त्यापुढील शहरांतील होते. त्यामुळे सणासुदीच्या ऑनलाइन खरेदीत छोट्या शहरांचा वाढता सहभाग अधोरेखित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

Bank Holiday: नवरात्रीत बँका बंद राहणार की सुरू? 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

IND A vs AUS A, 3rd ODI: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका तर गमावलीच, पण आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT